अधिक प्रकाशक शोधा
सह्याद्री प्रकाशन, पुणे
या प्रकाशकाबद्दल
सह्याद्री प्रकाशन ही संस्था पुणे येथे २००५ मध्ये स्थापन करण्यात आली असून प्रामुख्याने शिक्षण विषयक आणि संदर्भ पुस्तके प्रकाशित केली जातात. सह्याद्री प्रकाशनातर्फे जानेवारी २००५ पासून 'जडण-घडण' हे शैक्षणिक मासिक प्रकाशित करण्यात येते. सह्याद्री प्रकाशनातर्फे आम्ही ३४ पुस्तके प्रकाशित केली असून येत्या काही महिन्यात आणखी नवी १० पुस्तके प्रकाशित होतील. २०२३ मध्ये डॉ. माशेलकर यांचे डॉ. सागर देशपांडे लिखित चरित्र दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर' हे प्रकाशित झाले. १२ प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारे 'पुस्तकात न मावणारी माणसं' हे पुस्तक २०१८ मध्ये प्रकाशित केले होते. २०११ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जीवनचरित्र 'बेलभंडारा' प्रकाशित झाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा Reinventing India हा ग्रंथ आम्ही २०११ मध्ये प्रकाशित केला. आता त्याचे आठव्यांदा पुनर्मुद्रण होत असून भारताच्या माननीय राष्ट्रपती महोदयांनी विदेशी मान्यवर अतिर्थीना राष्ट्रपतींच्या वतीने भेट देण्यासाठी या महत्त्वपूर्ण ग्रंथाची निवड केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इ. १० वी च्या इंग्रजी पुस्तकामध्ये या ग्रंधातील 'Shaping Young Minds' हा पाठ समाविष्ट केला आहे. 'शोध नव्या भारताचा' या ग्रंथाचा स्मिता देशपांडे यांनी मराठी अनुवाद केला असून उत्कृष्ट वैचारिक ग्रंथाच्या अनुवादाबद्दलचा महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार स्मिता देशपांडे यांना मिळाला आहे. त्यापूर्वी आम्ही प्रकाशित केलेले डॉ. माशेलकर यांचे मराठीतील पहिलेच पुस्तक पंचशील नव्या युगाचे हे एस. एन. डी. टी. विद्यापीठाने त्यांच्या बी. एड्. च्या अभ्यासक्रमासाठी स्वीकारले आहे. तसेच सह्याद्री प्रकाशनाने प्रकाशित केलेले 'उत्कृष्ट शिक्षक घडविण्यासाठी' हे पुस्तक महाराष्ट्रातील सुमारे १५ हजार शिक्षकांपर्यंत पोचले आहे
साहित्यप्रकार
या प्रकाशकाची पुस्तके
सर्व पाहा