रिमझिम
Rimjhim
- प्रकाशक
- विश्वास प्रकाशन
- वर्ष
- २०२६
वर्गवारी
अंक नवीन टॅबमध्ये उघडेल
अंकाविषयी
रिमझिम दिवाळी 2026
बालसाहित्यामधलं जे जे उत्तम आहे, जे काही मुलांना आवडणारं आहे, हे सारं आपल्या अंकात यावं अशी आमची मनोमन इच्छा होती. अंकातील कथांचं वैविध्य, मुलाखत, माहितीपर लेख आणि यातील सहभागी मान्यवरांची नावं वाचल्यावर तुम्हीही हेच म्हणाल.
* प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी आणि त्यांचा गायक सुपुत्र शुभंकर यांची मनमोकळी मुलाखत घेतली आहे मानसी वैद्य यांनी.
* कृत्रिम बुद्धिमत्ता विषयातले जाणकार प्रसाद शिरगावकर यांनी इन्फ्लुएंझर कसं व्हावं याबद्दल लिहिलेला एक माहितीपूर्ण लेख. समाज माध्यमे हाताळणाऱ्या मुलांनी वाचायलाच हवा असा हा लेख.
* एकनाथ आव्हाड यांची मजेदार कोडी
* रत्नाकर मतकरी यांची तीर्थरूप देवबाप्पा ही नाटिका
याशिवाय,
संगीता बर्वे, मंगला गोडबोले, राजीव तांबे, सोनाली नवांगुळ, नीलिमा गुंडी, प्रदीप निफाडकर, डॉ. द. दि. पुंडे, मधुकर धर्मापुरीकर, डॉ. श्रुती पानसे, रवींद्र गुर्जर, अमृता खंडेराव, अभिजीत बेल्हेकर, प्रसाद मणेरीकर, आश्लेषा महाजन, वर्षा तोडमल, स्वाती दाढे, अंजली जोशी, डॉ. प्रिया निघोजकर, सुनील सुळे, सोनाली कोलारकर सोनार, मीनाक्षी मोहरील, संदीप गवई, गिरिजा देशमुख, श्रीनिवास शारंगपाणी अशा नामवंतांच्या बालकथा
सर्वत्र उपलब्ध.
संपर्क - विश्वास प्रकाशन 9420322982, 9545554391