Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

सौदीतले दिवस – पुस्तकाचे मुखपृष्ठ

सौदीतले दिवस

  • लेखक : रूपाली मावजो-कीर्तनी
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • अनुवादक : अदिती बर्वे
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २१२
  • किंमत : ₹२८०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

गोव्याच्या भूमीत वाढलेल्या रूपाली मावजो-कीर्तनी यांना लग्नानंतर दहा वर्षे सौदी अरेबियात राहावे लागले. तब्बल दहा वर्षे अशा जगात राहायचे; जिथले वातावरण, कायदे, संस्कृती, जगण्याच्या पद्धती, सगळेच वेगळे. अशा विपरीत परिस्थितीला आनंदाने, सहज स्वीकारणे, तिथल्या लोकांना, पद्धतींना आपलेसे करणे व आपल्या समंजस स्त्री-स्वभावातून कुटुंबाला स्थैर्य देणे, समृद्ध करणे ड्ढ हा प्रवास सोपा नव्हता. ह्या खडतर प्रवासाचे चित्रण लेखिकेने ओघवत्या शैलीत केले आहे. भारतीय मुक्तसंस्कृतीत वाढलेल्या स्त्रीला अशा बंधयुक्त वातावरणात राहणे किती अवघड असते, कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागते, कोणते वेगळे व अनपेक्षित अनुभव येतात; हे जाणून घ्यायचे असेल तर रूपाली मावजो-कीर्तनी यांचे हे आत्मकथन वाचायलाच हवे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके