अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
लोकपरंपरा : नाट्य आणि आविष्कार
पेपरबॅक
- लेखक : श्रीकृष्ण काकडे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८४
- किंमत : ₹३००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लोकसाहित्य
लोकपरंपरेतील नाट्याविष्कारांनी मराठीजनांना भरपूर निखळ आनंद दिला आहे. वासुदेवाच्या पहाटगाण्यापासून मध्यानरातीच्या कीर्तनापर्यंत सारे प्रहर लोकपरंपरेतील कलावंतांनी आनंद वाटण्याबरोबरच प्रबोधनही केले आहे. येथील मनांचा दुःखभार कमी करीत मानसिक आधार दिला आहे. जगण्याची नवी उमेद दिली आहे. हे सगळेच कथनकार येथील समाजाचे आत्मिक उन्नयन घडवत होते.
बदलत्या समाजजीवनात लोकपरंपरांचे महत्त्व कमी होत गेले असले तरी अजूनही कुळाचार, गावजत्रा, ग्रामदेवीची पूजा या निमित्ताने विधिनाट्ये होत असतातच. इतकेच नव्हे तर, जन्मापासून मृत्यूपर्यंत या लोककलांनी येथील माणसांचे जीवन व्यापून टाकले आहे. या विधिनाट्यातील नाट्य कसे असते, हे कलावंत अभिनयाचे कौशल्य कसे दाखवतात, हा आविष्कार होतो कसा, याचे दर्शन या पुस्तकातून घडते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-