Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण – पुस्तकाचे मुखपृष्ठ

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण

  • लेखक : श्री व्यं केतकर, व्यंकटेश केतकर, व्यंकटेश केतकर
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४०
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

मराठी साहित्यनिर्मितीच्या प्रारंभकाळापासून ते पेशवाईच्या अखेरीपर्यंत निर्माण झालेल्या मराठी वाङ्‌मयाकडे पाहण्याचा एक अभिनव दृष्टिकोन डॉ. केतकरांनी येथे प्रकट केला आहे. महाराष्ट्रीय कवींनी (आणि वाचकांनी) जे काव्यपरीक्षण केले, त्याचे आणि त्यांतून त्यांची जी वाङ्‌मयाभिरुची प्रकट झाली, तिचे ऐतिहासिक विवेचन डॉ. केतकरांनी या ग्रंथामध्ये केले आहे. मराठी कवींची काव्यनिर्मितीमागील भूमिका, प्रेरणा, प्रयोजन हे संस्कृत काव्यनिर्मितीमागील भूमिका, प्रेरणा, प्रयोजन यांच्यापेक्षा कसे भिन्न होते ते येथे स्पष्ट होते. डॉ. केतकर म्हणजे माहितीचा ‘ज्ञानकोश’. वाचकांच्या रूढ समजुतींना धक्के देऊन त्यांना स्वतंत्र विचार करायला लावणे हे डॉ. केतकरांचे वैशिष्ट्य याही ग्रंथात दिसते.प्राचीन मराठी वाङ्‌मयाच्या अभ्यासाच्या ज्या अनेक दिशा या ग्रंथात डॉ. केतकरांनी दाखविल्या आहेत, त्या आजही मार्गदर्शक आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके