अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
माणूसनामा
पेपरबॅक
- लेखक : कैलास पगारे, शंकर त्र्यंबक धर्माधिकारी, मोहन आळतेकर
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ फेब्रुवारी, २०१५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ९०
- किंमत : ₹१२०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
माणसाचे सर्व परिमाणानी आकलन करणारे कैलास पगारे हे एक महत्त्वाचे कवी आहेत. माणूस हा अमर्याद, अनाकलनीय आणि अथांग आहे. तोच सृष्टीचा कर्ताधर्ता आहे... हे माणसाचे एक रूप ते व्यक्त करतात. ते निसर्गाच्या अंगाने, परंतु जेव्हा ते व्यवस्थेच्या अंगाने त्याचा शोध घेऊ लागतात तेव्हा हाच माणूस त्यांना अस्वस्थ करतो. शूद्र, स्वार्थी, परंपरांच्या जोखडात बंदिस्त असणारा, क्रूर, शोषण करणारा, जातीधर्माचे विष पेरून स्वार्थाची पोळी भाजणारा, आपल्या अनुयायांशी बेईमान होऊन प्रस्थापितांच्या कळपात दाखल होणारा, स्त्रियांना परंपरांच्या गोठ्यात बांधू इच्छिणारा अशी माणसांची असंख्य रूपे त्यांच्या कवितेतून प्रकटत जातात. मूल्यगर्भ जीवननिष्ठा आणि त्यासाठीचा संघर्ष यावर कवीचा विश्वास आहे. किंबहुना ते बदलते आहे याचीही जाणीव त्यांची कविता प्रकट करते.
दीर्घता हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यासाठी भक्कम वैचारिक बैठक हवी असते. ती त्यांच्याकडे आहेच. त्यातून आकाराला आलेले अनोखे चिंतन आणि ते पेलून धरण्याचा दमदारपणा ही त्यांच्या प्रतिभेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. तीव्र संवेदनशीलता, बदलत्या जगाची अंतस्थ रूपे ओळखण्याची शक्ती, संयत तरीही थेट आविष्कार पद्धती यामुळे ही कविता अर्थपूर्ण तर होतेच, पण तिचे कविता म्हणूनही मूल्य वाढते.
- डॉ. नागनाथ कोतापल्ले
संमेलनाध्यक्ष
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-