Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

नांगरून पडलेल शतक	 – पुस्तकाचे मुखपृष्ठ

नांगरून पडलेल शतक

  • लेखक : रमेश चिल्ले
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ फेब्रुवारी, २००३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८०
  • किंमत : ₹८०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

नांगरुन पडलेलं शतक' म्हणजे कुणबिकीच्या यातनांचा चढता आलेख, मराठी ग्रामीण कवितेला समर्थ शब्द देणाऱ्या कर्वांच्यामध्ये श्री. रमेश चिल्ले यांचे नाव आता स्थिरपद झाले आहे. तुकारामाचा अभंग हा कुणब्याचा अंतःस्वर. तोच धागा रमेश चिल्ले यांनीही नेमका पकडला आहे. त्यांची अभंगरचना अंतरीच्या सर्व कळा-झळांनी प्रगटली आहे. आकांत, आक्रोश, दुःख, दैन्य या अनुभवांची नेटकी अभिव्यक्ती त्यांना साधली आहे. 'अंगरख्याची शिवणं उसवत बसलेली माणसं, ' झाडाबुडी चितागती बसलेलो बाप, जणू एक गाय-आजीमाय, अशा कवितांच्या मधून झण्त्कारणारी करुणा हे रमेश चिल्ले यांच्या कवितेचे वेगळेपण आहे. शब्दांना सलाम करणारा हा कवी 'जात्यावरली माय' मधून जुन्या आर्त ओव्यांची लकेर छेडतो तेव्हा आपलेही अंतःकरण व्याकुळ होते. ग्रामीण कवितेलाच नव्हे तर एकूण ग्रामीण भावविश्वाला तुकाराम आणि बहिणाबाई यांची भक्कम आधारशिला लाभली आहे. रमेश चिल्ले यांनी हा वारसा जपला आहे. -लक्ष्मीकांत तांबोळी

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके