Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

आधुनिक मराठी गेय कविता	 – पुस्तकाचे मुखपृष्ठ

आधुनिक मराठी गेय कविता

  • लेखक : सयाजीराजे मोकाशी
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १२ मार्च, २००२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ९६
  • किंमत : ₹१७५.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

प्रीत आणि गीत या दोन प्रक्रिया अशा आहेत की, जिथं रक्तातूनच समेवर यावं लागतं. गेयता ही गाण्यापुरतीच गोष्ट नसते; ती प्राणाची प्रतिज्ञाही आणि परिणतीही असते. गेयता ही कवीमनाला आतून आलेली हाक असते. संत आणि शाहीर त्या अधिष्ठानाचे क्षेत्रज्ञ आहेत; तेच खऱ्या अर्थानं गीतांचे लोक आणि लोकगीतांचे विश्वस्त ! आधुनिक मराठी गेय कवितेला त्या परंपरेची पुण्याई लाभणं हे महऱ्हाटी मातीचंच मोठेपण मानावं लागतं. अशाच आणि त्याच मोठेपणाची मांडणी प्रस्तूत संपादनाची मौलिकता आहे. प्रा. सयाजीराजे मोकाशी हा रानाच्या राष्ट्राचा नागरिक आहे; त्या राष्ट्राचा ऊर तसंच उरातला सूर रसिकांच्या कानावर पडावा या हेतूने हे डोळस संपादन सिद्ध करण्यात आलेलं आहे; 'देवराष्ट्रा' चाही ऊर भरून आला असता असा हा 'मुळा'तल्या रानाचा सूर आहे. कविता आकंठ झाली की गाण्यात गहिवरून जाते; गेय असणं हेच तिचं ध्येय आणि भागधेय ! प्रा. मोकाशी यांच्या भूमिकेतून, ह्याचा भूभाग किती तरणाबांड तसंच वाघांच्या किती अभयारण्यांचा आहे हे सूचित होतं ते व्यासंगानं. विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या हातावर ठेवावा असा हा गेय प्रसाद आहे; प्रसाद असणं हीच तर गेयतेची गुणवत्ता असते ! -फ. मुं. शिंदे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके