Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

देखणी संबंधी	 – पुस्तकाचे मुखपृष्ठ

देखणी संबंधी

  • लेखक : नीलकंठ कदम
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ ऑक्टोबर, २०००
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४६
  • किंमत : ₹४३०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण कवी हा त्याच्या भाषिक परंपरेमध्ये स्वतःची कवितेची संकल्पना घडवित असतो. भालचंद्र नेमाडे यांची कविता समकालीन मराठी कवितेमधीलं अनुभव, आशयसूत्रे, त्यांचे आविष्करण, आपले कालचे आणि आजचे सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरण, माणसामाणसातील संबंध, त्यातील नैतिक पेच, महानगरी जीवन, झपाट्याने विघटित होत जाणारी ग्रामसंस्कृती, स्त्रीपुरुषातील नाती, पुरुषसत्ताक व्यवस्था, मृत्युविषयीचा दृष्टिकोण अशा बहुविध गोष्टींविषयी आपल्याला अंतर्मुख करून प्रश्न विचारणारी आहे. समकालीन कवितेपासून या कवितेला पृथगात्म ठरवणारे हे तिचे प्रधान वैशिष्ट्य आहे. म्हणूनच या कवितेविषयी मराठीत काय लेखन झाले आहे, कोणकोणत्या व कशा प्रतिक्रिया नोंदल्या गेल्या आहेत हे समजावून घेणे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. नेमाडे हे कवी, समीक्षक व कादंबरीकार अशा नात्याने आपल्या काळातील अग्रणी भाष्यकार आहेत. त्यांच्या भाष्यासंबंधी त्यांचे समकालीन व पुढच्या पिढ्यांमधले लोक काय म्हणतात हे त्यांच्या कवितेच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहेच व एकूणात आपल्या वाङ्मयीन संस्कृतीवर गंभीर आणि सशक्त ठसा उमटविणाऱ्या या प्रतिभावंताला आपण कशा प्रकारे स्वीकारतो हे समजावून घेण्यासाठीही आवश्यक आहे. यासाठी प्रस्तुत संपादन उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. - प्रस्तावनेमधून

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके