अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
खुलासा
पेपरबॅक
- लेखक : किशोर खेडेकर
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १४ जानेवारी, २००६
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२८
- किंमत : ₹२२५.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
श्री. किशोर खेडेकर यांची कथा, शेती-मातीची, गाव शिवाराची, श्रमा-घामाची उत्कट व्यथा आहे. शेतकरी जीवनाची सारी 'चित्तरकथा' स्वतःच्या अनुभवाच्या कसातून सहज मुखरीत झालेली आहे.
...१९९० नंतर ग्राम व्यवस्थेचे सारे संदर्भ आज जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली येत आहेत. स्पर्धात्मक व्यापारीकरणामुळे माणसाच्या साऱ्याच अंगाला भयपण निर्माण झालेले दिसते. संभ्रम आणि माहिती तंत्रज्ञानाचे स्फोटक वास्तव, मूल्यांवर आघात करीत आहे. राजकारण, अर्थकारण, शिक्षण विशेष म्हणजे कौटुंबिक ताणतणावाची रूपेही कमालीची बदलत आहेत. या साऱ्या बदलात राबता शेतकरी समाज भरडला जात आहे. उत्पादन खर्चातील वाढ, शेतमालाची कवडी किंमत, कर्जबाजारीपणा, सिंचनाचा अभाव, वीजेची अनिश्चितता, बाजारपेठेतील लुटमार, कौटुंबिक ताणतणाव, प्रचंड बेकारी, वृध्दांचे प्रश्न, गुराढोरांचे प्रश्न, नित्याचे दुष्काळ, वाढते बाजारीकरण, या साऱ्यांच्या रेट्यांतून ढासळणारी मूल्यव्यवस्था या साऱ्याचे एकात्मिक परिणाम म्हणजे 'आत्महत्या' हा चुकीचा पर्याय उपाय म्हणून स्वीकारला जातोय!...
मराठी ग्रामीण कथा-कादंबरी कवितेतून होणारे उपरोक्त समस्यांचे चित्रण १९९० नंतरच्या पिढीने अतिशय टोकदारपणे चित्रित केलेले दिसते. आपले अनुभव निराळ्या शैलीतून, प्रभावी 'बोली' तून व्यक्त केलेले आहेत. श्री. खेडेकर यांची कथाही याच जातकुळीशी नाते सांगत प्रभावीषणे मांडलेली दिसते. पळवाट, दुसरा मृग, मुखवटा, निवद इ. कथा त्यांच्या सामर्थ्यांची प्रतिती देतात. एक समर्थ लेखक, निराळ्या शैलीचा ठसा उमटविणारा कथाकार म्हणून त्यांचे निश्चित स्वागत होईल, यासाठी त्यांना मनस्वी सदिच्छा !
भास्कर चंदनशिव
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-