Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अवघड दुखण्यांची प्रकरणं – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अवघड दुखण्यांची प्रकरणं

  • लेखक : रामचंद्र पठारे, रामचंद्र पठारे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७४
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

रामचंद्र पठारे यांचा हा दुसरा कथासंग्रह. शब्दांच्या वापरातील अचूकता, चित्रात्मकता, आशयानुरुप वेगवेगळी रुपे धारण करणारी व वेग बदलणारी अतिशय दणकट शैली हे त्यांच्या कथांचे विशेष म्हणता येतील. आपल्या जगण्याला गुदमरवून टाकणारे अनेक प्रश्न या कथांना आशयद्रव्य पुरवतात. म्हणूनच या कथा आपल्याला त्यांच्या जगात खेचून नेतात. त्यांच्यातून आपल्याला सहजी बाहेर पडता येत नाही. त्या तसे होऊ देत नाहीत. राजकारणी पुढारी, बेगवेगळ्या प्रकारचे दलाल, सरकारी नोकर, अभियंते, बायरमन, शेतकरी हे जसे या कथात येतात तसेच कविता, साहित्याचे बिश्व हेही त्यांच्या आस्थेचे विषय होतात. झपाटून टाकणारी निवेदनशैली, आशयावरील मजबूत पकड यामुळे या कथा अतिशय जोरकस उतरलेल्या आहेत. यातील 'नाळ' 'इस्क्रू' यासारख्या कथा एकूण मराठी साहित्यातही महत्त्वाची जागा घेतील अशा दर्जाच्या आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके