अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
गोपाळ गणेश आगरकर चरित्र
- लेखक : माधव अळतेकर, दामोदर अळतेकर
- प्रकाशन : वरदा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ५००
- किंमत : ₹५००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
गोपाळ गणेश आगरकर- चरित्रात्मक निबंध' ह्या ग्रंथाचे कर्ते म्हणून जाणते वाचक प्रा. माधव दामोदर अळतेकरांना ओळखतात. डेक्कन कॉलेजात एकाच वेळी शिकत असताना 'निबंधमालाकार' विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लेखनाचे हे तरुण चाहते होते. चिपळूणकर, टिळक आणि आगरकर ह्यांनी स्वार्थत्यागपूर्वक, लोकांना शहाणे करण्यासाठी 'न्यु इंग्लिश स्कूल' ही शाळा व 'केसरी' आणि 'मराठा' ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. कोल्हापूर प्रकरणात ह्या दोन संपादकांना १०१ दिवसांची शिक्षा झाली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन कॉलेजची स्थापना हे पुढचे पाऊल. ह्यामुळे क्रांतिकारक विचार, उच्चार व आचार ह्यांच्या अद्वैताचे एक नवे युग महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात सुरू झाले. 'विचारकलह' हे त्या काळाचे मर्मस्थान होते. स्वभावभेद असूनही नव्यानेच सुरू केलेल्या संस्थांचा कारभार कसा चालवावा, यावरून टिळक, आगरकर व इतर सहकाऱ्यांत तुटेपर्यंत वाद झाला. त्यात महाराष्ट्रात उद्भवलेल्या अनेक सामाजिक प्रकरणांची व वादांची भर पडली. या सर्वांचे वर्णन व विवेचन लेखकाने आपल्या ओजस्वी पण आग्रही शैलीने केले आहे. ह्याबरोबरच प्रा. अळतेकरांनी आगरकरांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व वाङ्मयीन विचारांचा थोडक्यात पण सर्वांगीण परिचय करून दिला आहे व त्याला विवेचनाची जोड दिली आहे. ग्रंथाचे 'चरित्रात्मक निबंध' हे नाव त्यामुळेच अन्वर्थक वाटते.
आगरकर आणि टिळक ह्यांच्यात जो वाद झाला, तो मुख्यतः 'राजकीय सुधारणा प्रथम, की सामाजिक सुधारणा प्रथम' ह्याबाबत होता. समाजाची आजची स्थिती पाहता; समाजसुधारणाच आधी हवी होती असे वाटायला लागते. ज्या दुष्ट रूढींवर आगरकरांनी हल्ला चढवला व जे सामाजिक प्रश्न उपस्थित केले, ते शंभर वर्षांनंतरही आज तसेच आहेत. यावरून आगरकरांचे द्रष्टेपण लक्षात येते. म्हणूनच आगरकरांच्या चरित्राचा अभ्यास पुन्हा एकदा व्हायला हवा, ह्या विचाराने या चरित्राचे पुनर्मुद्रण केले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-