Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

बाणगंगेच्या तीरी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

बाणगंगेच्या तीरी

  • लेखक : मधुकर कवडे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : ५ फेब्रुवारी, २०१२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८०
  • किंमत : ₹९०.००
  • आयएसबीएन : 9789380617237
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

संध्याकाळी तांबूस लाल धुळीबरोबर गायी घराला याव्यात आणि गुरा- वासरांच्या हंबरानं गाव व्याकूळ होऊन जावं. मंदिराच्या आरतीचा घंटानाद दूर माळरानावरही ऐकू यावा आणि हळू हळू चांदणं गावावर पसरून जावं. पहाटेला मोटेवरच्या गाण्यांनी, जात्यावरच्या ओव्यांनी गाव जागं व्हावं, असं कवीला आजही वाटतं.परंतु आधुनिक युगात ते शक्य नाही ही खंत कवी मधुकर कवडे यांना अस्वस्थ करीत राहते. म्हणूनच….. सायंकाळी घंटानाद गाव ऐकू येत नाही संकरित गायी कुठे चरावया जात नाही… अशा नव्या युगाची ओवी ते सहज लिहू शकतात. जुने गाव, सणवार, रिती-रिवाज आणि शेत शिवारात राबणाऱ्या बाया – माणसांचं दैनंदिन जगणं कवीने अगदी सहजसोप्या शब्दातून व्यक्त केलं आहे. कवी मधुकर कवडे यांच्या बाणगंगेच्या तीरावर आपण शांत बसून राहिलं तरी स्वच्छ, निर्मळ पाण्यात डुंबल्याचा आनंद तर मिळेलच शिवाय बाणेश्वराच्या मंदिरातील शांतता आपल्याही अंत:करणापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके