अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
दिवे गेलेले दिवस
पेपरबॅक
- लेखक : रंगनाथ पठारे
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ एप्रिल, १९८२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२०
- किंमत : ₹१७०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘दिवे गेलेले दिवस’ ही रंगनाथ पठारे यांची पहिली कादंबरी. पहिलेपणाच्या खुणा तिच्यात दिसतात हे खरे असले, तरी आज एक लेखक म्हणून त्यांची जी एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण नाममुद्रा तयार झाली आहे, तिच्या विकासाची बीजेही या कादंबरीतून ठायी ठायी दिसून येतात, हे अधिक महत्त्वाचे आहे. या कादंबरीत १९७५ चा आणीबाणीचा कालखंड आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतातली आणीबाणी ही एक अत्यंत महत्त्वाची उलथापालथ करणारी राजकीय घटना होय. या घटनेचा सर्जनशील अन्वयार्थ लावावा, असे भल्याभल्या नामवंत आणि प्रतिष्ठित मराठी कादंबरीकारांना वाटले नसताना रंगनाथ पठारेंसारख्या तरुण आणि नव्या लेखकाला हे धाडस करावेसे वाटावे, हेच मुळी लेखकाच्या संवेदनशीलतेचे, जबाबदारीचे आणि समकालीन घडामोडीबद्दल वाटणाऱ्या आस्थेचे प्रत्यंतर होय
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-