अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
चतुरंग पुरुषार्थ
- लेखक : सविता भावे
- प्रकाशन : वरदा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- संपादक : सविता भावे
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८२
- किंमत : ₹१४०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
भारतीय विचारपरंपरेत चार पुरुषार्थांची कल्पना पुरातन असून त्या विषयावर वेळोवेळी बरीच चर्चा झाली आहे. तथापि बदलत्या काळानुसार या संकल्पनांचे पृथ:करण, पुनर्मूल्यांकन फारसे केलेले आढळत नाही. सोप्या शब्दात पुरुषार्थ म्हणजे 'जीवनध्येय', ते सफल, संपन्न होण्यासाठी काय केले पाहिजे याचा आदर्श. अशा आदर्शाची तात्त्विक चर्चा करण्यापेक्षा काही महापुरुषांच्या जीवनांतून एकेक पुरुषार्थ कसा प्रकट होतो हे या ग्रंथामध्ये आटोपशीर पध्दतीने उलगडून दाखविले आहे. तसेच त्या अनुरोधाने आधुनिक काळात पुरुषार्थांचा अन्वय कसा लावला पाहिजे याचेही थोडक्यात दिग्दर्शन केले आहे.
लोकमान्य टिळक, शेठ वालचंद हिराचंद, प्राचार्य ना. ग. नारळकर आणि आचार्य विनोबाजी भावे अशा चार दिग्गजांची चरित्रे तर या छोटेखानी ग्रंथात थोडक्यात वाचावयास मिळतातच पण त्यांच्या आयुष्याचे मर्मही येथे समजावून दिलेले आहे. या दोन्ही दृष्टींनी या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.प्रत्येक सुसंस्कृत माणसाने संग्रही ठेवायला हवा इतके या ग्रंथाचे मोल असून घरांतील प्रत्येक पिढीने मनन केल्याच पाहिजेत अशा त्यांतील चरित्ररेखा आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-