अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
अनस्टॉपेबल
- लेखक : सरश्री
- प्रकाशन : वॉव पब्लिशिंग्स प्रा. लि
- प्रकाशन वर्ष : ३० डिसेंबर, १८९९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २४६
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : 9789390607181
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : इंग्रजी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
अनस्टॉपेबल याचा अर्थ संपूर्ण विश्वास असणं आणि साध्य करणं. तुमचा स्वतःवर, तुमच्या कौशल्यांवर व उद्दिष्टांवर भरवसा असतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमची ईश्वराच्या प्रेमावर व तुमच्या जीवनासाठी त्याने बनवलेल्या योजनेवर श्रद्धा असते. जगातले (लाखो) लोक निक वुईचिकचा प्रेरणादायी संदेश व त्याचा दुसरा चेहरा ओळखतात. जन्मतःच हात व पाय नसूनसुद्धा निकने अनेक साहसांचा आनंद लुटला, एक परिपूर्ण व सार्थ करिअर केलं आणि प्रेमळ नातेसंबंध जोपासले. एक विशिष्ट व अद्वितीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. आपलं जीवन मौल्यवान असून ते इतरांसाठी देणगी आहे आणि आयुष्यात कितीही दुःखं व संकटं आली तरी ईश्वर सदैव आपल्यासोबत हजर असतो या वचनांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून निकने सर्व समस्या व यातनांवर मात केली. अखंड विश्वासचं कृतीमध्ये रूपांतर होताना जी शक्ती प्रवाहित होते. त्याला निक आपल्या यशाचं श्रेय देतो.
परंतु हे सगळं घडतं कसं? अनस्टॉपेबल मधे निकने अशा समस्या व प्रतिकूल परिस्थितीचं वर्णन केलयं ज्यांना अनेक लोकांना आज सामोरं जावं लागतंय, उदा :
वैयक्तिक संकटं, आत्मघातकी विचार, भावना व व्यसने, नातेसंबंधातील समस्या, दुसर्यांना त्रास देणे, निर्दयीपणा व सहनशीलतेचा अभाव, करिअर व नोकरीमधील आव्हानं, शरीर, मन, हृदय व आत्मा यांतील असंतुलन, आरोग्य व अपंगत्व याबद्दल चिंता, निमंत्रण / ताबा सुटल्याची भावना
स्वतःच्या आयुष्यातील घटनांमधून व इतर काही जणांच्या अनुभवावरून निक दाखवून देतो, की अनस्टॉपेबल बनण्यासाठी व ‘‘उत्तम जीवन’’ जगण्यासाठी या समस्यांना कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-