Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

आणि... त्या दिवशी माझा मृत्यू झाला – पुस्तकाचे मुखपृष्ठ

आणि... त्या दिवशी माझा मृत्यू झाला

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : Anita Moorjani
  • प्रकाशन : वॉव पब्लिशिंग्स प्रा. लि
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४०
  • किंमत : ₹२७५.००
  • आयएसबीएन : 9788184154306
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : इंग्रजी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या अनिता या सिंधी सुखवस्तू कुटुंबातील. कॉर्पोरेट जगतात त्या काम करीत असताना डॅनी मुरजानी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. डॅनीबरोबर आनंदी, सुखी आयुष्य जगत असताना २००२ मध्ये अनिता यांना कर्करोगाचे निदान झाले. सुरुवातीला मध्यम स्वरूपाच्या कर्करोगाने कालांतराने भयावह रूप धारण केले. अनिता यांच्या संपूर्ण शरीरावर त्याने ताबा मिळवला. त्या कोमात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याची आशा सोडली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ३० तासांच्या कोमातून त्या जाग्या झाल्या. या काळात शरीराचा ताबा सोडून भौतिक जगापलीकडील जगात त्या पोचल्या. तेथे त्यांना स्वतःची वेगळी ओळख झाली. हा मृत्युच्या समीप असणारा अनुभव (एनडीई - नीअर डेथ एस्कपिरियन्स ) त्यांनी 'आणि... त्या दिवशी माझा मृत्यू झाला 'मधून सांगितला आहे. त्यांना पुन्हा मिळालेल्या आयुष्यात त्यांचा दृष्टीकोन बदलला. भीतीपासून त्या दूर गेल्या. सकारात्मक भूमिकेतून प्रत्येक गोष्ट पाहायची वृत्ती तयार झाली. या सर्व गोष्टींसंदर्भात त्यांनी यात खुलेपणाने सांगितले आहे. याचा मराठी अनुवाद नीता कुलकर्णी यांनी केला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके