Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

वैदर्भीय खाद्यसंस्कृती – पुस्तकाचे मुखपृष्ठ

वैदर्भीय खाद्यसंस्कृती

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : विष्णू मनोहर
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : २५ मे, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२८
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788119311439
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांत वैशिष्टय़पूर्ण आहे. प्रत्येक प्रांताची रचना वेगळी, आचरणाच्या, खानपानाच्या पद्धती वेगळ्या, भाषेचा गोडवा निराळा, आणि तरीही या विविधतेला महाराष्ट्रीय संस्कृतीच्या समान सूत्राने बांधले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ या प्रांताचा आगळे- वेगळेपणा भौगोलिक रचनेपासून खाद्यसंस्कृतीपर्यंत सर्वत्र आढळतो. येथील माणसे जशी मोकळी - ढाकळी, तसाच इथला पाहुणचारही! आणि अशा राजेशाही पाहुणचाराला साजेसे खाद्यवैभव येथील अगत्याला आपुलकीचा सुगंध देते. विदर्भातील खाद्यसंस्कृतीच्या वेगळेपणाचे गुपित इथल्या झणझणीत मसाल्यांमध्ये दडले आहे, हे तर खरेच! पण येथील मिष्टान्नांचे वैविध्य पाहूनही खवय्यांची रसना तृप्त होते. अशाच खास वैदर्भीय शाकाहारी व मांसाहारी पदार्थांच्या वैविध्याला आपल्या खुमासदार शैलीत या पुस्तकरूपात आणत आहेत, जगप्रसिद्ध विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर! त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी पदार्थ अधिक चांगला होण्यासाठी केलेले मार्गदर्शन व माहितीमुळे हे पुस्तक अधिक रंजक झाले आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके