Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

प्रक्षोभ  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

प्रक्षोभ

  • लेखक : प्रकाश जाधव, व्यंकटेश महाजन, य. बा. मोकाशी
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : ३ ऑक्टोबर, २०२५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३३६
  • किंमत : ₹४९९.००
  • आयएसबीएन : 9789348048530
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘प्रक्षोभ’ या आत्मकथनात्मक कादंबरीचे लेखक प्रकाश जाधव आहेत. या कादंबरीत आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि अतिवंचित असलेल्या कुटुंबातील एका शालेयवयीन मुलाने शिक्षणासाठी केलेल्या धडपडीची, ध्येयपूर्तीसाठी सोसलेल्या दाहक अनुभवांची प्रेरक सत्यकथा कथन केलेली आहे. ‘जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव’ या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा मानणाऱ्या या आत्मकथनात्मक कादंबरीत शिक्षण घेण्यासाठी आप्तस्वकीय आणि इतरांशी कराव्या लागलेल्या संघर्षाची गोष्ट सांगितलेली आहे. जीवनातील अडचणींवर मात करून ‘तिमिराकडून तेजाकडे’ मार्गक्रमण कसे करावे याचा बोध आपल्याला या कादंबरीतून घेता येतो. पाचवीला पूजलेली गरिबी, भोवतालची घोर नकारात्मकता, सामाजिक हिणवणूक, या भयाण वास्तवात अंगिकारलेली सकारात्मक जगण्याची उर्मी आणि झंझावाती संघर्षातून निर्माण झालेली ध्येयवेडी अभिलाषा या कादंबरीत दिसून येते. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना’ साद घालत ‘उजेडाचे वारस’ होण्याची आकांक्षा बाळगणारी ही आत्मकथनात्मक कादंबरी वंचितांना शिक्षणासाठी प्रेरित आणि उद्युक्त करणारी आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके