Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

ग्रामीण मातंग स्त्री : एक समाजशास्त्रीय अभ्यास – पुस्तकाचे मुखपृष्ठ

ग्रामीण मातंग स्त्री : एक समाजशास्त्रीय अभ्यास

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : रामचंद्र भिसे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३३४
  • किंमत : ₹५००.००
  • आयएसबीएन : 9788184836912
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

भारतीय समाजरचनेचा अभ्यास केल्यास असेच लक्षात येते की, जातिभेदाबरोबरच पुरुष प्रधानता व लिंगभेद यालाही तेवढेच महत्त्व दिलेले आहे. स्त्रियांच्या भूमिका व दर्जा याबद्दल जेव्हा विचार केला जातो, तेव्हा लक्षात आले की, पुरुषप्रधानता, जातिभेद, लिंगभेद या तिहेरी शोषणाची ‘ती’ बळी आहे. अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेल्या ५९ जातींची ओळख अस्पृश्य व दलित जाती म्हणून आहे. या जातींमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वास्तव्य करणार्‍या महार, मातंग, चांभार या जाती लोकसंख्येने अधिक आहेत. अनुसूचित जातीतील कनिष्ठ व वंचित जात म्हणून मातंग जातीबद्दल काही अभ्यास व संशोधन झालेले आहे; परंतु, मातंग स्त्रियांचा दर्जा व भूमिका, प्रश्न व समस्या याबद्दलची फारशी मांडणी संशोधनातून व अभ्यासातून झालेली नाही. मातंग स्त्री ही स्वतंत्र लिखाण व अभ्यासापासून वंचित होती; त्यामुळेच संशोधक म्हणून दलित मातंग स्त्रियांबद्दल स्वतंत्र संशोधन करून, ती तिहेरी शोषणास कशी बळी पडते. तिचे प्रश्न व समस्या इतर स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहेत. याकडे स्त्री चळवळीने, दलित चळवळीने, स्त्री अभ्यासकांनी कसे दुर्लक्ष केले. या व इतर बाबींचा आढावा या संदर्भग्रंथातून घेतला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके