Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

महाराष्ट्रातील संगीतपरंपरा   – पुस्तकाचे मुखपृष्ठ

महाराष्ट्रातील संगीतपरंपरा

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : शुभदा कुलकर्णी
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१०
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६०
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788184832358
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

संगीत हे एखाद्या पुरातन पण सतत वाढत्या अजरामर वटवृक्षासारखे आहे. त्याला किती फांद्या आणि पारंब्या फुटत राहतील याला सीमा नाही. ते असीम आनंदाने भरलेले आहे. रागसंगीताच्या आणि भावशब्द- संगीताच्या परंपरेत महाराष्ट्राने भरीव आणि मोलाची भर घातली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र बहुतेक बाबतीत नेहमीच सर्वसमावेशक राहिलेला आहे. संगीतकलाकारांसाठी रसिक आणि धनिक यांनी महाराष्ट्रात उदार, परंतु विचक्षण असे धोरण ठेवलेले आहे. कोणत्याही नवीन सौंदर्यप्रणालीचे स्वागत आपल्या विचक्षण बुद्धीला साक्षी ठेवून महाराष्ट्र आजवर अतिशय साक्षेपाने आणि उदारमतवादी धोरणाने करत राहिलेला आहे. या पुस्तकात रागसंगीत, नाट्यसंगीत, लावणी आणि शब्द-भावसंगीत यांचा प्रामुख्याने परामर्श घेतलेला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके