Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मुले छोटी स्वप्ने मोठी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मुले छोटी स्वप्ने मोठी

  • लेखक : प्रा शिवाजी बागल
  • प्रकाशन : शब्दशिवार प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : -
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : 9789349353015
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

प्रा. शिवाजीराव बागल यांचा ‘मुले छोटी स्वप्न मोठी’ हा बाल कथासंग्रह प्रसिद्ध होत आहे. बालवयात मुलांच्या मनावर जे संस्कार होतात ते चिरकाल टिकतात. याच उद्देशाने या बाल कथा लहान मुलांच्या बालसुलभ, निरागस आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्वावर सुसंस्कार करणार्‍या आहेत. ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ या उक्तीप्रमाणे बालपणीचा काळ सुखाचा असतो. याच वयात मनसोक्त जगता येतं, वाट्टेल तिथे हुंदडता येतं, मनाप्रमाणे वागता येतं, आपल्याच धुंदीत जगता येतं. बालवयातच मुले आपल्या आदर्शाच्या शोधात असतात. या वयात त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करणारे गुरू, मार्गदर्शक, मित्र भेटले तर त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळते. मुलांच्या सभोवताली उत्तम आदर्श आणि निरोगी वातावरण असेल, तर त्याचा सुयोग्य परिणाम त्यांच्या जीवनावर होतो. लहान मुले-मुली ही अनुकरणप्रिय असल्याने चुकीची संगत, वाईट सवयी, अयोग्य मार्गदर्शन यांचा विपरीत परिणाम बालमनावर होण्याचा धोका संभवतो. कोर्‍या पाटीवर चांगलं कोरल गेलं, तर समृद्ध व सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी त्याचा हातभार लागतो. या बाल कथासंग्रहामधून संस्कारशील, विचारी, समतोल, सर्वसमावेशक अशी पिढी घडण्यास निश्चित मदत होईल असा आशावाद वाटतो.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके