Logo
Logo
अर्जुन वाजपेयी यांचे छायाचित्र

अर्जुन वाजपेयी

अल्प परिचय

२०१० साली अर्जुन वाजपेयी त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी एव्हरेस्ट चढणारा सर्वांत तरुण गिर्यारोहक ठरला. शालेय जीवनापासूनच अर्जुन एक उत्तम अॅथलिट आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू होता. त्याने नोएडा येथील त्याच्या शाळेतून, रियान इंटरनॅशनलमधून रोलर स्केटिंग, तायकोंदो, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा अनेक खेळांमध्ये प्राविण्य मिळवून अनेक आंतरशालेय स्पर्धांमध्ये बक्षीसं पटकावली आहेत. एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर आता तो नवनवीन महत्त्वाकांक्षी अॅडव्हेंचर ट्रेक पूर्ण करायची स्वप्न बघत आहे. त्यामध्ये उत्तर व दक्षिण ध्रुवावरची मोहीम, मीटरपेक्षा उंच अशी तेरा शिखरं सर करणं आणि सर्व खंडातील उंच शिखरं काबीज करण्याचा त्याचा मानस आहे. गिर्यारोहणाव्यतिरिक्त वाचन हा त्याचा आवडता छंद आहे. विशेषत : धाडसी व्यक्तींच्या व प्रवाशांच्या थरारक कथा वाचायला त्याला आवडतं.