Logo
Logo
प्रभाकर कुंटे यांचे छायाचित्र

प्रभाकर कुंटे

अल्प परिचय

डॉ. प्रभाकर कृष्णाजी कुंटे (जन्म : इ.स. १९३०; - पुणे, ७ ऑगस्ट, इ.स. २०१५ हे एक मराठी खगोल वैज्ञानिक व लेखक होते. टाटा संशोधन संस्थेत ते ३७ वर्षे नोकरी करत होते. * त्यांच्या ’गुरुत्वाकर्षणीय भिंगा’च्या संशोधनाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. डॉ. कुंटे यांनी कॅनडातल्या कॅलेगरी विद्यापीठात आमंत्रित म्हणून काम केले आहे. ’विज्ञानभारती’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. * त्यांनी अकरा विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लेखनाला महाराष्ट्र सरकारने तसेच बालसाहित्य परिषदेने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. *** डॉ. प्रभाकर कुंटे य़ांनी लिहिलेली पुस्तके * अंतरिक्ष वारकरी * खग्रास सूर्यग्रहण * ताऱ्यांचे अंतरंग * दुर्बिणींचे विश्व’ या कै. सुनील जोगळेकर यांनी १९८९ साली लिहिलेल्या पुस्तकातले ’रेडिओ खगोलशास्त्र' हे अकरावे प्रकरण * धूमकेतूची स्वारी * भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. सी. व्ही. रामन (चरित्र) * मानवाची अंतराळ झेप (वैज्ञानिक) * व्यंकटेश बापूजी केतकर (चरित्र)