Logo
Logo
अनुराग श्रीकांत लव्हेकर यांचे छायाचित्र

अनुराग श्रीकांत लव्हेकर

अल्प परिचय

डॅा.अनुराग श्रीकांत लव्हेकर एम् बी बी एस्. , एम् डी. (मेडिसीन), डी. एम् (गॅस्ट्रोएंटेरॅालॅाजी व हिपॅटॅालॅाजी) त्रिवेणी हॅास्पिटल, कैलासनगर, नांदेड. ** शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, येथून पदवी प्राप्त. एन के पी सीम्स, नागपूर व जे एस एस वैद्यकीय महाविद्यालय, मैसूर येथून पदव्युत्तर शिक्षण. ** शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड, सेंट जॅान्स हॅास्पिटल बेंगलोर, केअर हॅास्पिटल रायपूर, गॅलॅक्सी हॅास्पिटल, नांदेड, सागर हॅास्पिटल बेंगलोर येथे पदव्युत्तर कामाचा अनुभव. ** सध्या अपोलो हॅास्पिटल्स बेंगलोर येथे कार्यरत. ** राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या परिषदांमधून व नियतकालिकांमधून अनेक शोधनिबंधांचे सादरीकरण व प्रकाशन. ‘** निनाद फाउंडेशन, नांदेड’ या आरोग्य व शिक्षणक्षेत्रात कार्यरत समाजसेवी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष. ** अवयवरोपण क्षेत्रातील कार्याबद्दल सह्याद्री हॅास्पिटल, पुणेतर्फे सन्मान. ‘ ** सेवार्थ क्लिनीक’ हा धर्मार्थ दवाखाना नांदेड येथे कार्यरत. ** सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दर वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला गम बूटांचे वाटप व तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन.शेकडो शेतकऱ्यांना लाभ. ** अनेक रक्तदान शिबिरे व आरोग्य शिबिरांचे आयोजन. अनेक कॅन्सरग्रस्त रूग्णांना सर्जरी व केमोथेरपीकरता थेट सहाय्य. ** आरोग्यविषयक प्रश्नांवर जनजागृतीसाठी ‘ Ninad Foundation ‘ हे मराठी यू ट्यूब चॅनल. सियाचीन येथे सैन्यासाठी नागरिकांतर्फे उभारल्या जाणाऱ्या ॲाक्सिजन प्लॅंटकरिता ‘सिर्फ’फाऊंडेशनशी संलग्नता आणि योगदान. ** भटक्या व विमुक्त समाजातील सर्वार्थाने निराधार मुलांसाठीची गोंदिया येथील ‘पालावरची शाळा’ संस्थेतर्फे दत्तक. ** नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ईयत्ता नववी व दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे दर वर्षी वाटप केले जाते. शेकडो लाभार्थी. ** ग्रामीण भागातील आरोग्य व शिक्षण सेवा सुधारण्यासाठी संस्थेतर्फे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ** वाचन, प्रवास, भटकंती,लेखनाची आवड. इतिहास आणि भूगोल ही विशेष आवडीची क्षेत्रे. ** जागतिक घडामोडी व राजकारण व त्यांची भारताच्या प्राचीन परंपरा, संस्कृती, आस्था, लोकजीवन, मध्ययुगीन इतिहास व सद्य परिस्थिती यांच्यांशी सांगड घालण्याच्या प्रयत्नातून ‘वसुंधरेचे शोधयात्री‘ हा साहसी दर्यावर्द्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा पहिला ग्रंथ यावर्षी राजहंस प्रकाशन संस्था, पुणेतर्फे प्रकाशित. ** या ग्रंथाला प्रसाद बन राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार मार्च २०२४ मध्ये मिळालेला आहे. ** तसेच उत्कृष्ट साहित्यासाठी दिला जाणारा कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचा ‘ क.रा.म.सा.प .कल्याणरत्न’ पुस्कार एप्रिल २०२४मध्ये मिळालेला आहे. ** अश्वमेध ग्रंथालय, सातारातर्फे दिला जाणारा ‘ अक्षरगौरव’ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार ॲागस्ट २०२४मध्ये प्राप्त झाला. ** महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व धृपद एंटरटेनमेंट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ साहित्यवलय’ राज्यस्तरीय पुरस्कार ॲाक्टोबर २०२४ . ** जीवनविकास ग्रंथालय व वाचनालय, छत्रपती संभाजीनगरतर्फे देण्यात येणारा कै.सावित्रीबाई जोशी पुरस्कार डिसेंबर २०२४ ** नवी दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित वक्ता. ** ‘माझी मराठी’ या महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिकांच्या त्रैमासिकासाठी नियमित लेखन. ** समाजमाध्यमांवर स्फुट लेखन व पुस्तक परिचय. ** महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार,संवर्धनासाठी प्रयत्नशील.