Logo
Logo
अच्युत बन यांचे छायाचित्र

अच्युत बन

अल्प परिचय

डॉ. अच्युत बन - एम.डी. (मेडिसीन) कार्य व मानसन्मान : * नांदेड येथे वैद्यकीय सेवेची ३२ वर्षे पूर्ण * मार्ड सचिव, आयएमए सचिव म्हणून कार्य * सन २००० साली प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानची स्थापना * प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरीव कार्ये - ** जिल्ह्यात अनेक आरोग्यशिबिरांचे नेटके आयोजन ** मधुमेह, हृदयरोग, अ‍ॅनिमिया या रोगांसाठी जनजागरण ** ‘मुकाबला मधुमेहाशी’ या रुग्ण शिक्षणपर पुस्तकाचे लिखाण ** आजीव सदस्य - आय.एम.ए., ए.पी.आय., इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ इकोकॉर्डियोग्राफी, आर.एस.एस.डी.आय. ** सिनेट सदस्य, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड साहित्य पुरस्कार योजना : सन २००१ पासून मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्याचा सन्मान, पुरस्कार * प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार * स्व. पद्मिनबाई प्रसाद बन साधना सन्मान * प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार वाचनचळवळीतील सहभाग : * पद्मिनबाई सार्वजनिक वाचनालय - २००४ पासून सुरुवात * खेळ व योगासाठी लघू क्रीडा संकुलाची निर्मिती (२००४) पर्यटनाचा छंद जोपासत ५२ देशांची सपत्नीक भेट पर्यटनावर आधारित २००३ पासून आजतागायत प्रवासवर्णनपर लिखाणांची अठरा (१८) पुस्तके प्रकाशित. - दोन हिंदी भाषेतील प्रवासवर्णने - ‘दशकपूर्ती’ व ‘रौप्यमहोत्सव रुग्णसेवेचा’ ही दोन संपादित पुस्तके. पुरस्कार व सन्मान : १. डोडोलँड डॅगनलँड (२००८) - सॅन होजे मिलापिटास येथे प्रथम विश्व मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित २. परिक्रमा पश्चिम युरोपाची (२००३) - एस.ओ.टी.सी.तर्पेâ अंगीकृत २ हजार प्रती ट्रॅव्हल किटमध्ये वितरित ३. मोशमोशी जपान (२०१०) - मराठी वाड्.मय परिषद बडोदे (गुजरात) या संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त, अंकुर साहित्य पुरस्कार (२०१२) ४. किवी-माओरीच्या विश्वात (२०१५) - अभिरुची पुरस्कार, मराठी वाङ्मय परिषद बडोदे (गुजरात) ५. पुन्हा यांकीजच्या देशात (२०१६) - मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचा साहित्यपुरस्कार ६. मुकाबला मधुमेहाशी (२००४) - सहलेखिका - डॉ. वर्षा बन - महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार ७. प्रमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार, नांदेड (२०१४-१५)