Logo
Logo
गिरीश पिंपळे यांचे छायाचित्र

गिरीश पिंपळे

अल्प परिचय

जन्मतारीख: १३ फेब्रुवारी १९५९ शिक्षण: एम. एस्सी., एम. फिल., पीएच्‌. डी. (भौतिकशास्त्र) नोकरी : आर. वाय.के. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथून भौतिकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून निवृत्त . • सुमारे ४० वर्षांपासून विज्ञानाचा – विशेषत: खगोलशास्त्राचा - सोप्या व आकर्षक भाषेत प्रसार • खगोलशास्त्र या विषयावर शेकडो लेख आणि स्लाईड शो सह भाषणे • पुणे येथील ‘ आयुका ‘ संस्थेत एक संशोधन प्रकल्प पूर्ण • विज्ञान- प्रसार आणि खगोलशास्त्र विषयावरील अनेक राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग • मराठी विश्वकोशात अनेक नोंदींचे लेखन • प्रकाशित पुस्तके : कुतूहल खगोलाचं, वेध खगोलाचा, कथा हबल दुर्बिणीची आणि विज्ञानाच्या अंतरंगात • ‘वेध खगोलाचा’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट मराठी साहित्य निर्मिती’चा पुरस्कार • खगोलशास्त्र-प्रसारासाठी रोटरी क्लबच्या वतीने व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार • मराठीतून केलेल्या विज्ञान - प्रसारासाठी इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या पुणे शाखेतर्फे डॉ. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार • विज्ञान –प्रसारासाठी आर्ट्स सेंटर मुंबई या संस्थेतर्फे शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार • स्वा. सावरकर साहित्याचे अभ्यासक / वक्ते / लेखक • सावरकर चरित्र कथनासाठी पॉवर पॉइंट सोफ्टवेयर वापरून ‘शतपैलू सावरकर’ या कार्यक्रमाची निर्मिती *** पुरस्कार * वेध खगोलाचा या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाड्मय निर्मिती पुरस्कार * खगोल शास्त्राच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल रोटरी क्लब, नाशिक यांच्या वतीने व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार * आर्टस् सेंटर, मुंबई यांच्यातर्फे विज्ञान -प्रसारासाठी शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार. * इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या पुणे शाखेतर्फे, मराठीतून केलेल्या विज्ञान-प्रसारासाठी डॉ. मो.वा.चिपळूणकर पुरस्कार * सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार. * पुणे येथे झालेल्या सावरकर साहित्य संमेलनात गौरव. * सावरकर जन्मशताब्दी निमित्ताने मुंबईच्या सावरकर साहित्य अभ्यास मंडळातर्फे गौरव.