Logo
Logo

मराठी साहित्यविश्वात आपले स्वागत आहे​

मराठी साहित्य व्यवहाराबद्दल सर्वंकष माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या या डिजिटल पोर्टलवर मराठी पुस्तक, लेखक, प्रकाशक, विविध ग्रंथालये यांसोबत भाषिक सेवा, मुखपृष्ठ चित्रकार, मराठी भाषा व साहित्यप्रेमी यांबद्दलचा अमूल्य ठेवा उपलब्ध आहे. ​

मान्यवरांची शिफारस

लोड करत आहे...
नवं कोरं पुस्तक

लोड करत आहे...
पुस्तक परीक्षण/ओळख

लोड करत आहे...
आजची कविता

लोड करत आहे...

ताज्या घडामोडी

९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात

तब्बल ३२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान यंदा साताऱ्याला मिळाला आहे. ९९ वे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिधिनी उपस्थित होते. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट देऊन आली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी सकाळी पुणे येथे संपन्न झाली. त्यात साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले.

दिनविशेष

लोड करत आहे...

नवीन लेख / मुलाखती

लोड करत आहे...

लोकप्रिय पुस्तके

नवी कोरी पुस्तके

मराठी भाषा, वाचनसंस्कृती आणि साहित्यसंवर्धनाकरता सुरू असेलल्या विविध उपक्रमांबद्दलची माहिती

लोड करत आहे...

व्हिडिओ

लोड करत आहे...