"अमृतातेही पैजा जिंके" असं श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी जिचे वर्णन केले आहे, ती आपली मराठी भाषा म्हणजे अनेक साहित्यालंकाराने सजलेली समृद्ध खाण आहे. साहित्याच्या विविध प्रकारात आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने सतत भर घालणारे सरस्वतीपुत्र जितके मराठीला लाभले, तितके फारच थोड्या भाषांना लाभले असतील.अशा या समृद्ध मराठीचा वसा आणि वारसा जगासमोर मांडणारे आपले व्यासपीठ म्हणजे, मराठी साहित्यसृष्टी!

या साहित्याची जननी असलेल्या मराठीला अगदी संतांपासून ते आत्ताच्या नवलेखकांपर्यंत मराठीवर प्रेम करणाऱ्या रसिक वाचकांच्या प्रदीर्घ वाचकपरंपरेनेही समृद्ध केलं आहे. मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्याला वाचक, रसिकांपर्यंत पोहचवण्याकरता मराठी साहित्यसृष्टी या संकेतस्थळाची व अ‍ॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे.आतापर्यंतच्या सर्व मराठी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या समग्र मराठी साहित्याबाबतची अद्ययावत माहिती डिजिटल स्वरुपात, अगदी एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे 'मराठी साहित्यसृष्टी' हे मराठी साहित्यविश्वातील एक अग्रगण्य पोर्टल आहे. वाचकांना आवडलेली पुस्तके थेट प्रकाशकांच्या संकेतस्थळांवरून पुस्तक खरेदीची सोय वाचकांना उपलब्ध होणार आहे.

Pen Logo

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे.

मराठी साहित्यविश्वात आपले स्वागत आहे​

मराठी साहित्य व्यवहाराबद्दल सर्वंकष माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या या डिजिटल पोर्टलवर मराठी पुस्तक, लेखक, प्रकाशक, विविध ग्रंथालये यांसोबत भाषिक सेवा, मुखपृष्ठ चित्रकार, मराठी भाषा व साहित्यप्रेमी यांबद्दलचा अमूल्य ठेवा उपलब्ध आहे. ​

grid png 1

मान्यवरांची शिफारस

साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी स्वत: शिफारस केलेल्या पुस्तकांची यादी वाचकांना इथे पाहता येईल. ​

grid png 2

पुस्तक परीक्षण/ओळख ​

पुस्तकांची परीक्षणे व ओळख करून देणारे लेख इथे वाचता येतील. ​

grid png 3

आजची कविता​

मराठी साहित्यात कवितेची दीर्घ परंपरा राहिली आहे. मराठी साहित्यविश्वातील कवितांचा हा खास खजिना वाचकांसाठी.​

ताज्या घडामोडी

श्रीमती तारा भवाळकर

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर ह्यांची निवड करण्यात ... अधिक माहिती

लोकप्रिय पुस्तके

मराठी साहित्यविषयातील संक्षिप्त माहिती

सन १९००मधील वाचन या विषयावरचे पुस्तक ​

सन १९०० मध्ये कोल्हापुरातून प्रकाशित होणाऱ्या 'ग्रंथमाला' मासिकात प्रकाशित झालेला सुमारे ८० पृष्ठांचा निबंध त्या मासिकाचे संपादक वि.गो. विजापूरकर यांनी नंतर पुस्तक रूपात प्रकाशित केला होता. त्याचे लेखक यादव शंकर बावीकर होते. त्याची किंमत १० आणे होती. पुस्तकाचे नाव 'वाचन’होते.​

मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित​ ​

पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली.​

मराठी भाषा, वाचनसंस्कृती आणि साहित्यसंवर्धनाकरता सुरू असेलल्या विविध उपक्रमांबद्दलची माहिती

Event 1

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तीन दिवसीय विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. ​

Event 2

सातवे नुक्कड साहित्य संमेलन आणि तिसरे बाल साहित्य संमेलन ४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे संपन्न झाले.​

Event 3

१ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. ​

Event 3

मराठी भाषा बोलली जावी व तिचा वापर व्यवहारात करावा यासाठी आता सरकारने सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिर्वाय केले आहे.​